भारत, चीनमुळे झालं इंधन महाग- ओबामा

Last Updated: Friday, March 2, 2012 - 16:17

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी इंधन किमतीतील महागाईसाठी भारत, चीन आणि ब्राझीलला जबाबदार धरलं आहे. यावर्षी अमेरिकेत निवडणूक होणार असून सद्य अमोरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर इंधनांच्या किंमतीत होणाऱ्या वाढीबद्दल टीका केली जात आहे. हा मुद्दयामुळे निवडणुकीत आपली हार होऊ नये, यासाठी ओबामांनी इंधन किंमतीमधील वाढीची कारणमीमांसा केली.

 

विश्लेषकांच्या मते निवडणुकीत रिपब्लिकन ओबामांना हारवण्यासाठी इंधन किंमतीतील वाढीचा मुद्दा वापरत आहे. अमेरिकन राष्ट्रपती ओबामा म्हणाले, फक्त विचार करून पाहा, पाच वर्षांत चीनमधील कार्सची संख्या तिप्पट वाढली आहे. चीनमध्ये २०१०मध्ये १ कोटी नव्या कार्स रस्त्यावर आल्या. केवळ एका देशात एका वर्षात १ कोटी नव्या कार्स येतात, यावर मोठ्याप्रमाणावर इंधन खर्च होत आहे.

 

ओबामा म्हणाले, “चीन आणि भारतासारख्या देशांत मोठ्या प्रमाणात श्रीमंती येत आहे. ते सुद्धा आपल्याप्रमाणेच नवनव्या कार्स खरेदी करू लागले आहेत. ते देखील कार्समध्ये इंधन भरू लागले आहेत, जसं आपण भरतो. यामुळेच इंधनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.”  अर्थात, एवढं बोलूनही ओबामा य़ांनी इंधनांच्या किमती कमी करण्याबद्दल कोणतंही अश्वासन दिलेलं नाही.

 



First Published: Friday, March 2, 2012 - 16:17


comments powered by Disqus