मध्य अमेरिकेवर वादळी संकट

Last Updated: Saturday, March 3, 2012 - 16:18

www.24taascom, शिकागो

 

मध्य अमेरिकेमध्ये लागोपाठ आलेल्या ७० हून जास्त चक्रीवादळांमुळे आत्तापर्यंत कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. एवढंच नव्हे तर मेरिसविल हे शहर पूर्णपणे उध्वस्त झाले. चक्रीवादळाने केवळ घरंच उध्वस्त केली नाहीत, तर शाळा आणि दुकानंही जमीनदोस्त झाली आहेत.

 

अवजड ट्रक, मोठमोठी झाडं पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेले. चक्रीवादळाच्या तडाख्यात आलेल्या पाच राज्यांमध्ये ढगांचा कडकडाटाने येथील वातावरण भयावह झाले आहे. एक स्कूल बस एका घरावर जाऊन आपटली. कित्येक ट्रक तलावात बुडून गेले. काही लाकडी घरांना आग लागली.

चक्रवादळात अग्निशमन दलाचे ऑफिस, शाळा, जेल सगळंच उध्वस्त झालं. केंटुकी प्रांतात बचावकार्य तालू आहे. बचावकार्यासाठी आलेली गाडीदेखील उलटली आणि विजेच्या तारेवर आपटली आणि तिलाही आग लागली.

First Published: Saturday, March 3, 2012 - 16:18
comments powered by Disqus