'मनमोहन सिंग : सोनियाज् पुडल'

Last Updated: Tuesday, July 17, 2012 - 10:19

www.24taas.com, लंडन

 

‘अंडरअचिव्हर’ अशी पदवी मिळालेल्या भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लंडनच्या एका वृत्तपत्रानं ‘सोनियाज पुडल’ अशी उपाधी बहाल केलीय.

 

काही दिवसांपूर्वीच ‘टाईम मॅगझीन’नं अंडरअचिव्हर म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कुचकामी ठरवलं होतं. आता लंडनच्या ‘द इंडिपेन्डन्ट’ या वृत्तपत्रानं मनमोहन सिंग यांच्या कार्यकालाचा आढावा घेत एक लेख प्रसिद्ध केलाय. या लेखाचं शीर्ष आहे ‘मनमोहन सिंग : इंडियाज सेव्हिएर ऑर सोनियाज पुडल’... ‘भारताचा तारणहार की सोनियांचं श्वान’ असा प्रश्न विचारत लंडनच्या या वृत्तपत्रानं मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केलीय.

 

अर्थातच, याबद्दल भारतातून या विरुद्ध जोरदार प्रतिक्रिया उमटल्यात. आता आपल्या मॅडमसमोर ‘ब्र’ न उच्चारणारे मनमोहन सिंग हे या टीकेला तरी उत्तर देतील का? याकडे समस्त भारतीयांचं लक्ष लागलंय.

 

.First Published: Tuesday, July 17, 2012 - 10:19


comments powered by Disqus