विजय माझाच - ओबामा

Last Updated: Tuesday, July 31, 2012 - 13:41

www.24taas.com,  वॉशिंग्टन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. अमेरिकेचे सद्य राष्ट्रपती बराक ओबामा यांना मात्र आपण प्रतिद्वंदी मिट रोमनी यांच्यावर विजय मिळवू, अशी पूर्ण खात्री आहे. पण, ही लढत इतकी सोपी नसल्याचंही त्यांनी मान्य केलंय.

 

राष्ट्राध्यक्ष ओबामा सध्या न्यूयॉर्कमध्ये आपल्या प्रचार दौ-यावर आहेत. ‘निवडणुका आजही असत्या तरी माझ्या मते या निवडणुका तेवढ्याच अटीतटीच्या होतील. पण, मला मात्र पूर्ण विश्वास आहे की विजय माझाच होईल. अजूनही निवडणुकीला ९९ दिवस बाकी आहेत’, असं ओबामांनी यावेळी म्हटलंय.

 

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा निवडणूक लढत असलेल्या ओबामांना आपल्या कार्यकालात अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्तस्वरूप द्यायचंय. ओबामांना विश्वास आहे की, ‘युरोपला स्थिरता प्राप्त करून देणं, शिक्षणक्षेत्रात स्वत:ची छाप सोडणं, विज्ञान-तंत्रज्ञान-ऊर्जा अशा विविध क्षेत्रांना प्रगतीपथावर नेणं अशा काही कामांत प्रगती घडवून आणली गेली तर येणा-या कार्यकालात अमेरिकेच्या वर्चस्वाला कुणी धक्काही लावू शकणार नाही’

 

.

 

First Published: Tuesday, July 31, 2012 - 13:41
comments powered by Disqus