सैफ अली खानचे काका होणार ISI प्रमुख?

Last Updated: Monday, February 27, 2012 - 21:48

www.24taas.com, इस्लामाबाद

 

टीम इंडियाचे माजी कर्णधार  दिवंगत मन्सूर अली खान पतोडी यांचे चुलत बंधू आणि सध्या पाक गुप्तहेर संघटना आयएसआयचे उपमहासंचालक इस्फंदियार अली खान यांच्या गळ्यात आयएसआयच्या प्रमुखपदाची माळ पडणार असल्याचे वृत्त आहे. बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानचे ते चुलते आहेत. इस्फंदियार खान हे सध्या आयएसआयमध्ये दुस-या क्रमांकाच्या पदावर विराजमान आहेत.

 

सध्याचे आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट अहमद शुजा पाशा यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. मात्र पाक सरकार पाशा यांचा कार्यकाळ वाढविणार नसल्याचे वृत्त आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यापूर्वी एक महिना आधी पाशा हे आयएसआय प्रमुख झाले होते.

 

शिवाय मेमोगेट प्रकरणातही पाशा अडकले आहेत. पाशा यांच्याकडे पाकच्या अण्वस्त्रांचा ताबा असणारे स्ट्रेटेजिक प्लॅन्स डिव्हिजन सोपविण्याची तयारी सुरु आहे.

 

आयएसआयच्या प्रमुखपदासाठी सध्या लष्करी गुप्तचर संघटनेचे महासंचालक मेजर जनरल नोशाद कयानी, लाहोरचे कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल रशीद आणि कराची कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल जहिरुल इस्लाम यांच्या नावाचा समावेश आहे.

 

First Published: Monday, February 27, 2012 - 21:48
comments powered by Disqus