'सोनिया गांधींना अमेरिकेतून हाकला'

Last Updated: Saturday, March 3, 2012 - 16:37

www.24taas.com, न्यूयॉर्क 

 

अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा  सोनिया गांधी यांना तात्काळ अमेरिकेतून हाकलण्याची मागणी करण्यात आली आहे.  ही मागणी  अमेरिकेतील एका शीख संघटनेने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन या संघटनेने हिलरी यांना दिले आहे.

 
अमेरिकेतून सोनियांना हाकलण्याची  मागणी  करणाऱ्या संघटनेचे नाव आहे शीख फॉर जस्टिस (एसएफजे).  अमेरिकन कायद्यातील कलम २१२ (अ) (३) (ई) (२) (३) आणि ६०४ ची अंमलबजावणी करण्यात यावी, असे  हिलरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्या व्यक्तीवर विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असेल, अशा व्यक्तीला या कलमांनुसार देशाबाहेर हाकलण्याची तरतूद आहे, असे या संघटनेचे कायदा सल्लागार गुरपतवंतसिंग यांनी  म्हटले आहे.

 

 

सोनिया गांधी यांना अमेरिकेत स्थान नाही आणि त्यांचे आगमन स्वागतार्हही नाही.  सोनिया गांधी या १९८४ मधील शीख दंगल दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या दंगलीत गुंतलेल्या काँग्रेसच्या काही नेत्यांना वाचविण्याचा गुन्हाही त्या करत आहेत. त्यामुळे त्यांना अमेरिकेतून हाकलण्यात आले पाहिजे.  सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत आल्या आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेतील एका रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

First Published: Saturday, March 3, 2012 - 16:37
comments powered by Disqus