'२६/११' हल्ल्यामागेही लादेन?

Last Updated: Wednesday, April 4, 2012 - 09:33

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

अमेरिकन सरकारने हाफिझ सईदला पकडण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला दहा दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं आहे. हाफिझ सईद मुंबईवर झालेल्या 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यामुळे भारताच्या दहशवादाविरुध्दच्या लढ्याला आणि सईद दहशतवादी कारवायांना जबाबदार असल्याचा दाव्यालाही बळकटी मिळाली आहे.

 

पण, काही पुराव्यांतून असंही दिसून येत आहे की, अल-कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन याचाही २६/११च्या मुंबई हल्ल्यामध्ये महत्वाचा सहभाग होता. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यात १६६ लोकांचा बळी गेला होता, तर ३०० हून जास्त लोक जखमी झाले होते.

 

२६/११ मधील लादेनच्या सहभागाची माहिती अमेरिकेच्या स्पेशल फोर्सने दिली. गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये अमेरिकन सैन्याने लादेनचा खातमा केला, तेव्हा त्यांना त्याच्याजवळ अनेकदस्तऐवज तसंच काँप्युटर  सामुग्री मिळाली होती.

 

हे दस्तऐवजा तसंच काँप्युटरमधील माहिती ओसामाचं २६/११ हल्ल्यामध्ये असणाऱ्या भूमिकेचे पुरावे दर्शवत आहे, असं पाकिस्तन टेररिझम एक्स्पर्ट तसंच अमेरिकन पंतप्रधान ओबामा यांचे पाकिस्तानविषयक सल्लागार ब्रुस रिडेल यांनी स्पष्ट केलं आहे.

 

अमेरिकेने या प्रकरणात जातीने लक्ष घालून हाफिझ सईदचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा यासाठी केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम प्रयत्न करत आहेत. २६/११ हल्ल्याच्या वेळी हल्ल्यातील दोषी सईद हा ओसामाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.

First Published: Wednesday, April 4, 2012 - 09:33
comments powered by Disqus