‘आयएनएस विक्रांत’ची चीनला भरली धडकी

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, August 21, 2013 - 11:43

www.24taas.com , झी मीडिया, बिजींग
भारतीय बनावटीनं बनलेलं विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘जापानचं हेलिकॉप्टर’ सैन्यात सहभागी केल्यानं चीनला धडकी भरलीय. चीनमधील मीडियात आलेल्या एका बातमीत असा आरोप करण्यात आलाय की, काही देश चीनचं सामर्थ्य संतुलित करण्यासाठी भारताचं समर्थन करत आहेत.
‘भारताचं आयएनएस विक्रांत आणि जापानचं हेलिकॉप्टर वाहक सैन्यात सहभागी होणं ही चीनसाठी एखाद्या चेतावनी सारखंच आहे’, असं ‘ग्लोबल टाईम्स’च्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका लेखात लिहिलेलं आहे.
‘शांघाय इन्सिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीज’च्या ‘सेंटर फॉर आशिया-पॅसिफिक स्टडीज’चे सहाय्यक संशोधक ज्योंगीनं आपल्या लेखात लिहीलंय की, “जहाजासाठींचं महत्त्वाचं तंत्र अजून भारताजवळ नाहीय, जहाज दुरुस्ती आणि सुधारणांसाठी भारत इतर देशांवर अवलंबून आहे. मात्र अनेक देश आधुनिक हत्यारं विकसीत करण्यासाठी भारताची मदत करत आहेत. चीनचं सामर्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हे देश भारताला मदत करत आहेत” असं काही चीनी विद्वानांचं म्हणणं आहे.
भारताला पश्चिमी देशांच्या हेतूंबाबतची चांगली जाणीव आहे, भारतीय मीडिया आणि राजकीय नेते सैन्याचं सामर्थ्य वाढवण्यावर जोर देत आहेत, असाही दावा लेखात करण्यात आलाय. यावरुनच असंच दिसून येतंय की, एकंदरीतच भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’मुळं चीनला धडकी भरलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013 - 11:43
comments powered by Disqus