चीनमध्ये ‘नग्न विवाहा’ला मिळतेय प्रचंड मान्यता!

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, August 14, 2013 - 07:57

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनमध्ये विवाहाच्या एका नव्या प्रथेला झपाट्यानं लोकप्रियता मिळतेय. हा विवाह म्हणजे ‘नग्न विवाह’. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हे तथ्य पुढं आलंय. चीनमध्ये हुंडा न घेता केल्या गेलेल्या लग्नाला ‘नग्न विवाह’ म्हणतात. घर आणि कार न घेता लग्न करणं हा या लग्नाचा विशेषतः हेतू आहे.
चीनमधील वृत्तपत्र ‘चीन डेली’नुसार, चीन इथली एक मीडिया कंपनी ‘टचमीडिया’द्वारं चीनला १३ ऑगस्टला साजरा होणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त पाच शहरांमधल्या १५.९ लाख नागरिकांवर हे सर्व्हेक्षण केलं गेलं. या पाच शहरांमध्ये चीनची राजधानी बीजिंग, शांघाय आणि क्वांगचों या शहरांचा समावेश आहे.
सर्व्हेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीनुसार ‘नग्न विवाह’ म्हणजेच घर आणि कार न घेता विवाह करण्यासंबंधी ४५ टक्के लोकांनी स्विकृती दर्शवलीय. मात्र चीनमध्ये ३० टक्क्यांहूनही कमी लोक हुंडा घेऊन लग्न करतात. लग्नानंतर आपला पगार जोडीदाराबरोबर वाटून घेण्यासंबंधी ७० टक्के लोकांनी सहमती दर्शवलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013 - 07:55
comments powered by Disqus