पाकिस्तानात १० कोटी नागरिकांचे मोबाईल बंद

पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम हाती घेतली आहे. पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला जाग आली आहे,   पाकिस्तानात १४ कोटी मोबाईलधारक आहेत, मात्र अनेकांची माहिती उपलब्ध नाही.

Updated: Dec 29, 2014, 09:03 PM IST
पाकिस्तानात १० कोटी नागरिकांचे मोबाईल बंद  title=

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम हाती घेतली आहे. पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला जाग आली आहे,   पाकिस्तानात १४ कोटी मोबाईलधारक आहेत, मात्र अनेकांची माहिती उपलब्ध नाही.

 सरकारने मोबाईल कंपन्यांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर तत्काळ १० कोटी जणांचे मोबाईल बंद करण्यात आले आहेत.

पाकिस्तानमधील मोबाईल कंपन्यांनी तब्बल दहा कोटी प्री-पेड मोबाईलधारकांचे नंबर चौकशीसाठी बंद केले आहेत. सरकारने या कंपन्यांना चौकशीकरण्यासाठी 28 दिवसांची मुदत दिली आहे.

मोबाईल कंपन्यांनी प्री-पेड सीमकार्ड धारकांची चौकशी करण्यासाठी १५०-२०० दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र, अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने 28 दिवसांची परवानगी दिली आहे, असे वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.