सीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी

दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 22, 2013, 09:21 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, दमिश्क
दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय, असा आरोप सीरियामधल्या मुख्य विरोधी पक्षांनी केलाय. ही माहिती देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही व्हिडिओ जाहीर केलेत. या व्हिडिओमध्ये डॉक्टर एका लहानग्यावर उपचार करताना दिसत आहेत. या व्हिडिओची सत्यता पडताळणी अजून बाकी आहे. इतर फुटेजमध्ये अनेक लोक जमिनीवर पडलेले दिसतात. यांमध्ये अनेक लहानग्यांचाही समावेश आहे. काही जणांचे शव पांढऱ्या कपड्यात लपेटलेलेही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
मात्र, विरोधी पक्षानं केलेल्या आरोपामध्ये रासायनिक हत्यारांचा उल्लेख करण्यात आलाय त्याची सत्यता उघड होणं बाकी आहे. संयुक्त राष्ट्राच्यासमोर दमिश्कनं आत्तापर्यंत अनेकदा रासायनिक हत्यारांच्या वापर केल्याच्या वृत्ताला खोटं ठरवलंय. संयुक्त राष्ट्राच्या उद्देशाला खो घालण्यासाठी असा आरोप केला जात असल्याचं, दमिश्कनं म्हटलंय.
विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र सरकारला खोटं ठरवलंय. कार्यकर्त्यांच्या एका नेटवर्क लोकल कॉर्डिनेशन कमिटीनं (एलसीसी) सरकारनं केलेल्या रासायनिक हल्ल्यात अनेक जण मारले गेल्याचं म्हटलंय.

सरकारी संवाद समिती ‘सना’च्या बातमीनुसार, गोऊतामध्ये रासायनिक हत्यांच्या वापराच्या बातम्या खोट्या आहेत. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री विल्यम हेग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या देशातील रासायनिक हत्यारांच्या प्रयोगाचा हा मुद्दा सुरक्षा परिषदेतमध्ये मांडला जाणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.