...या अवैध बांग्लादेशींचं काय करावं बरं?

गेल्या दोन वर्षांमध्ये दिल्लीहून तब्बल 1,576 बांग्लादेशी नागरिकांना मायदेशी धाडण्यात आलंय. ही माहिती खुद्द सरकारनं दिलीय. 

Updated: Jul 30, 2014, 10:23 PM IST
...या अवैध बांग्लादेशींचं काय करावं बरं? title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांमध्ये दिल्लीहून तब्बल 1,576 बांग्लादेशी नागरिकांना मायदेशी धाडण्यात आलंय. ही माहिती खुद्द सरकारनं दिलीय. 

गृह राज्य मंत्री किरन रिजिजू यांनी आज राज्यसभेला माहिती देताना ही माहिती दिलीय. वर्ष 2012 मध्ये 902 बांग्लादेशी नागरिकांना परत धाडलं गेलं तर 2013 साली 674 जणांना... असं रिजिजू यांनी सांगितलंय.  

वैध दस्तावेजांशिवाय बांग्लादेशी नागरिकांनी भारतात प्रवेश केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशातच अनेक बांग्लादेशी नागरिक गुप्त रुपात आणि छुप्या मार्गानं भारतात प्रवेश करतात, असंही उघडकीस आलं होतं. यामुळे, सध्या देशातील विविध भागांत नक्की किती बांग्लादेशी नागरिक अजुनही अवैधरित्या राहत आहेत, हे सांगणं संभव नाही. 

रिजिजू यांनी बीजदच्या कल्पतरू दास यांच्या प्रश्नावर लिखित स्वरुपात उत्तर देताना, दिल्ली उच्च न्यायालय आणि उच्चतम न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सरकारनं वर्ष 2005 मध्ये अवैध बांग्लादेशी नागरिकांना धुंडाळून काढण्यासाठी आणि त्यांना परत मायदेशी धाडण्यासाठी एक योजना बनवून तिला अंतिम रुप दिलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.