दोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश

पाकिस्तान प्रशासनाने दोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिसा मुदत संपूनही गेल्या दोन महिन्यांपासून व्हिसा नव्याने तयार न केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

Updated: May 10, 2014, 06:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
पाकिस्तान प्रशासनाने दोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिसा मुदत संपूनही गेल्या दोन महिन्यांपासून व्हिसा नव्याने तयार न केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
यात `द हिंदू` च्या मिना मेनन आणि `प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय)` च्या स्नेहेश ऍलेक्स फिलीप यांचा समावेश आहे. या पत्रकारांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दोन्ही पत्रकरांना पाकिस्तान सोडून जाण्याचे तोंडी आदेश दिले आहेत, मात्र कोणतेही लेखी कारण देण्यात आलेले नाहीत.
फिलीप आणि मेनन हे ऑगस्ट 2013 पासून पाकिस्तानमध्ये वार्तांकन करत आहेत. फिलीप आणि मेनन यांना सुरवातीला तीन महिन्यांचा व्हिसा मिळाला होता. त्यानंतर ते सतत तीन महिन्यांनी व्हिसाच्या मुदतीत वाढ करून घेत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.