अमेरिकेनंतर चीनमध्ये बॉम्बस्फोट, २१ ठार

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, April 24, 2013 - 21:36

www.24taas.com, बीजिंग
अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर चीनलाही दहशतवाद्यांनी टार्गेट केले आहे. चीनमध्ये जिनजियांग प्रांतात दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात २१ लोक ठार झालेत.
चीनच्या परराष्ट्रालय मंत्रालयाच्या प्रवक्ते हुअ चुनयंग यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला काशगर शहरातील बाचू काऊंटीत करण्यात आला. या हल्ल्यात २१ लोकांचा बळी गेला आहे. पोलिसांनी सहा संशयीताना ठाक केले तर आठ संशयीताना अटक करण्यात आले आहे.

सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार १५ लोक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. अमेरिकेत काही दिवसांपूर्वी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. आता चीनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने जगाला दहशतवाद्यांचा धोका असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

First Published: Wednesday, April 24, 2013 - 21:36
comments powered by Disqus