चीनमध्ये भीषण स्फोटात ३० ठार

चीनचं औद्यगिक त्याझिनमध्ये रात्री उशिरा झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झालाय, तर ४०० हून अधिक लोक जखमी आहेत. 

PTI | Updated: Aug 13, 2015, 09:40 AM IST
चीनमध्ये भीषण स्फोटात ३० ठार title=

बीजिंग : चीनचं औद्यगिक त्याझिनमध्ये रात्री उशिरा झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झालाय, तर ४०० हून अधिक लोक जखमी आहेत. 

चीनी वेळेनुसार रात्री ११ वाजून २० मिनिटांनी त्यांजिनमध्ये दोन स्फोट झाले. स्फोटात दोन रासायनिक गोदामं भस्मसात झालीय. या स्फोटानंतर मोठी घबराट पसरली. लोक सैरावैरा पळू लागले होते.

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की जवळपासच्या दहा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर लागलेली आग अद्याप विझलेली नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.