नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

नेपाळला पुन्हा एकदा ५.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकेचे भूगर्भ विभाग यांच्यानुसार भूकंपाचं केंद्र नेपाळमधील नामचे बाजार आहे.

Updated: Nov 28, 2016, 08:51 AM IST
नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के title=

काठमांडू : नेपाळला पुन्हा एकदा ५.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकेचे भूगर्भ विभाग यांच्यानुसार भूकंपाचं केंद्र नेपाळमधील नामचे बाजार आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्र रामेछाप आणि सोलुखुम्बु जिल्ह्यातील सीमेवर आहे. जी राजधानी काठमांडूपासून १३१ किमीवर आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने माहिती दिली आहे की, आज सकाळी नेपाळमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले.

हा भूकंप ५.५ रेक्टर स्केल तीव्रतेचा होता. यामध्ये अजून कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती नाही आहे. मागील वर्षी २५ एप्रिल २०१५ ला नेपाळमध्ये भूकंपामुळे ९००० लोकांचा मृत्यू झाला होता तर २२००० हून अधिक जण जखमी झाले होते.