विमानाला लटकून, गोठवणाऱ्या थंडीत 5 तास प्रवास

Last Updated: Tuesday, April 22, 2014 - 10:14

www.24taas.com, झी मीडिया, कॅलिफोर्निया
अमेरिकेत 16 वर्षाच्या मुलाने विमानाच्या चाकांवरील भागात असलेल्या जागेत लपून प्रवास केला. या मुलाने गोठवणाऱ्या थंडीत, 12 हजार मीटर उंचीवर, जेथे अतिशय कमी प्रमाणात ऑक्सिजन असतो, असा 5 तासांचा हा प्रवास केला आहे.
संबंधित एअरलाईन्स कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार विमान कॅलिफोर्नियाला उतरलं, तेव्हा विमान कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की, चाकांच्या वरील भागात कुणीतरी आहे.
या युवकाची अमेरिकेची एजन्सी एफबीआय चौकशी करतेय, एफबीआयच्या चौकशीनंतर या मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे. या मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा घरून पळून आला आहे, सेंट जॉर्ज विमानतळावरील कम्पाऊंड ओलांडून हा मुलगा चाकाच्या वर असलेल्या जागेत जाऊन बसला. या मुलाच्या प्रकृतीबद्दल आम्हाला चिंता असल्याचं संबंधित एअरलाईन्सने म्हटलं आहे.
एफबीआयचे प्रवक्ते टॉम साईमन यांनी म्हटलंय, मुलगा भाग्यशाली म्हणावा लागेल, कारण तो वाचलाय.
विमान जेव्हा माऊई विमानतळावर आलं तेव्हा हा मुलगा उडी मारून बाहेर आला आणि तो विमानतळावर फिरत होतो. तेव्हा त्याच्या केसांमध्ये कंगवाही अडकवलेला होता.
मात्र उड्डाणादरम्यान 12 हजार मीटर उंचीवर, जेथे ऑक्सिजन फार कमी असतो, तसेच गोठवणाऱ्या थंडीत हा मुलगा जिवंत राहिला हे विशेष, प्रवासादरम्यान तो अनेक वेळी बेशुद्धावस्थेत होता.
हा मुलगा वाचल्यानंतर 1947 पासूनचं रेकॉर्ड पळताळून पाहिलं जात आहे, आतापर्यंत चाकांच्या वर असलेल्या जागेत लपून प्रवास करण्याचे जवळपास शंभर प्रयत्न झाले आहेत. यातील 75 टक्के लोकांचा मृत्यू झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 22, 2014 - 10:05
comments powered by Disqus