हा पाहा... पाच वर्षांचा धाडसी पायलट!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, September 4, 2013 - 10:53

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनमध्ये अवघ्या पाच वर्षांचा एक चिमुकला विमान उडवून आजवरचा सगळ्यात कमी वयाचा पायलट बनलाय. ‘हो यिडे’ असं या चिमुकल्याचं नाव आहे. घरात सगळीजणं त्याला लाडानं ‘डुओडुओ’ म्हणूनच हाक मारतात.
`डुओडुओ`नं २१ ऑगस्ट रोजी बीजिंगमधल्या वन्यजीव पार्कमध्ये तब्बल ३५ मिनिटे विमान उडवल्याची नोंद झालीय.
अशी कामगिरी डुओडुओनं काही पहिल्यांदाच केलेली नाही... तर याआधीही अनेकदा अशाच काही करामती करून अनेकांना हैराण केलंय. २०१२मध्ये म्हणजेच मागच्याच वर्षी केवळ चार वर्षांच्या डुओडुओला बर्फात अर्धनग्न अवस्थेत बर्फात पळताना अनेकांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं. न्यूयॉर्कमध्ये मायनस १३ डिग्री तपमानात त्याच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ बनविला होता. हा व्हिडिओ खूप लोकप्रियही झाला होता.
मीडियाच्या बातमीनुसार, याच चिमुरड्यानं एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विमान चालवण्याचा पराक्रमही केला होता. तसंच जबरदस्त वादळात आणि पावसात जपानच्या फुजियामा टोकावरही तो चढलाय.

डुओडुओचे पिता लिएशेंग यांना आपल्या मुलाला साहसी आणि धाडसी बनवायचंय. एखादी गोष्ट माहीत करून घेणं आणि ती शिकून घेण्याची इच्छा डुओडुओत निर्माण व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013 - 10:52
comments powered by Disqus