८ वर्षांच्या मुलाने केलं ६१ वर्षांच्या बाईशी लग्न!

By Jaywant Patil | Last Updated: Monday, March 11, 2013 - 16:04

www.24taas.com, लंडन
दक्षिण आफ्रिकेमध्ये आठ वर्षांच्या मुलाचं ६१ वर्षीय महिलेशी लग्न लावण्यात आलं. शाळेमध्ये शिकणार ८ वर्ष सनेल मसिलैला याचं त्याच्याहून वयाने कित्येक वर्षं मोठी असणाऱ्या ६१ वर्षीय हेलन शबंगु हिच्याशी विवाह झाला. हेलन स्वतः ५ मुलांची आई आहे.
मुख्य म्हणजे असा विचित्र विवाह करण्याचं कारण म्हणजे सनेलच्या पूर्वजांच्या आत्म्यांना आनंद देण्यासाठी करण्यात आला. सनेलच्या कुटुंबाला त्यांच्या मृत पूर्वजांनी हे लग्न करण्यासाठी आग्रह केल्याचं सांगितलं जात आहे. जर हे लग्न केलं नाही, तर हे आत्मे कुटुंबाला हानी पोहोचवतील अशी भीती सनेलच्या घरच्यांना वाटू लागली. त्यामुळे सनेलने हा विवाह केला. या लग्नाला १०० पाहुणे उपस्थित होते. लग्नात सनेलने हेलनबरोबर अंगठीची देवाण घेवाण केली आणि तिला किस करत विवाह संपन्न केला.

गंमत म्हणजे या लग्नानंतर लग्नाच्या सर्टिफिकेटवर दोघांनी सही केली आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेले. कारण, हा विवाह केवळ नाममा६ होता. या विवाहानंतर दोघेही आपल्या पूर्वायुष्यात परतले. हेलन पुन्हा आपल्या पतीसोबत राहू लागली आणि सनेल आपल्या पालकांसोबत. हेलनचं अल्फ्रेड याच्याशी पूर्वी लग्न झालं आहे. त्यांचा मोठा मुलगाच ३७ वर्षांचा आहे. अल्फ्रेडने देखील सनेल आणि हेलनच्या विवाहाबद्दल आनंद व्यक्त केला.

First Published: Monday, March 11, 2013 - 16:04
comments powered by Disqus