आश्चर्य! 9 वर्षीय मुलानं मगरीच्या तोंडातून स्वत:ला सोडवलं

अमेरिकेत नऊ वर्षाच्या एका शूर मुलानं नऊ फुट मगरीसोबत लढा दिला आणि स्वत:ला मगरीच्या तोंडातून मुक्त केलं. 

PTI | Updated: Aug 11, 2014, 02:49 PM IST
आश्चर्य! 9 वर्षीय मुलानं मगरीच्या तोंडातून स्वत:ला सोडवलं title=

ह्यूस्टन : अमेरिकेत नऊ वर्षाच्या एका शूर मुलानं नऊ फुट मगरीसोबत लढा दिला आणि स्वत:ला मगरीच्या तोंडातून मुक्त केलं. 

जेम्स बार्ने नावाचा हा चिमुरडा फ्लोरिडामध्ये एका तलावात पोहायला गेला होता. तिथं थोड्यावेळानं त्याला जाणवलं की, त्याला मगरीनं पकडलंय.

हॉस्पिटलच्या खाटेवर तो बार्नेनं आपली रोमांचकारक कथा सांगितली. तो म्हणाला की, जेव्हा त्याला जाणवलं की ही मगर आहे. मग त्यानं आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि मगरीवर प्रहार केला. 

बार्ने सांगतो, मला मगरीचा जबडा जाणवत होता. मी घाबरलो, काही कळत नव्हतं काय करावं. नंतर मी मदतीसाठी ओरडलो, मग काही जणांनी मला बाहेर काढलं.  

मुलाच्या शरीरावर मगरीच्या दातांचे अनेक मार्क्स आहेत. डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून मगरीचा एक दातही बाहेर काढलाय. बार्नेला तो दात आठवण म्हणून जतन करून ठेवायचाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.