९२ वर्षीय वृद्धाचा २२ वर्षीय तरुणीशी विवाह

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, July 8, 2013 - 13:03

www.24taas.com, झी मीडिया, बगदाद
नातवांचं आणि आजोबांचं लग्न एकाच मांडवात... होय, हे खरं आहे. बगदादमध्ये ही अशक्य वाटणारी गोष्ट घडलीय. हे आजोबा शेतकरी आहेत.
इराकमधल्या बगदाद इथं राहणाऱ्या एका ९२ वर्षीय वृद्धानं केवळ २२ वर्षांच्या एका तरुणीशी विवाह केलाय. बरं खर्च वाढायला नको म्हणून आपल्या दोन नातवांचीही लग्नही या बिलंदरानं आपल्याबरोबरच एकाच मांडवात लावून दिली. तब्बल चार तास चाललेल्या या लग्नसोहळ्यात ९२ वर्षाचे मुसली मोहम्मद-अल-मुजामी यांनी २२ वर्षांच्या मुना मुखलिफ अल-जुबरी हिच्याशी लग्न केलं. याच सोहळ्यात आजोबांच्या १६ आणि १७ वर्षांच्या नातवंडांचे `निकाह` पार पडले.

९२ व्या वर्षी लग्न करणाऱ्या आजोबांचा गोतावळाही खूप मोठा आहे. त्यांना पहिल्या पत्नीपासून आधीच १६ मुले आहेत. वयाच्या ५८ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. `दुसऱ्या लग्नानंतर आयुष्यातले नवे पर्व सुरू झालं, मी स्वत:ला २० वर्षांचा भासतोय` असं म्हणत आजोबांनी आनंद व्यक्त केलाय. सुरुवातीला नातवंडांची लग्नं जमत नव्हती. अखेर एकाच वेळी स्वतःसोबतच दोन्ही नातवंडांचेही संसार सुरू झाल्यामुळे आजोबा एकदम खूष आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 8, 2013 - 13:03
comments powered by Disqus