१ लाख पुरुषांसोबत करायची आहे `तिला` शय्यासोबत!

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, September 1, 2013 - 16:15

www.24taas.com, झी मीडिया, वरसॉ
साधारणतः चांगलं, सुसंस्कृत आयुष्य जगण्याचं स्वप्न प्रत्येक सामान्य माणूस उराशी बाळगून असतो. मात्र पोलंडमधील वरसौ शहरातील एनी लिसेव्सका या २१ वर्षीय तरुणीचं आयुष्याचं ध्येय काही वेगळंच आहे. एनीच्या आयुष्याचं मिशन आहे जगातील १ लाख पुरुषांशी शय्यासोबत करण्याचं... विश्वविक्रम करण्यासाठी भलताच कारनामा या एनीने निवडला आहे.
आपलं मिशन पूर्ण करण्यासाठी २१ वर्षीय एनी जगभरात फिरत आहे. एनीने गेल्याच महिन्यात या मिशनला सुरूवात केली आहे. अवघ्या एका महिन्यात एनीने २८४ जणांशी संभोग केला आहे. एनी दिसायला स्थुल आहे. तिचे डोळे निळे आहेत, चेहरा गोल आहे, केस काळेभोर आहेत. अशा मुलीने इतकं वाह्यात मिशन का सुरू केलं आहे, असा प्रश्न भल्याभल्यांना पडला आहे. अर्थातच, एनीच्या बॉयफ्रेंडला एनीची ही गोष्ट मान्य नाही. मात्र तरीही त्याने एनीला सोडलेलं नाही.
ऑस्ट्रेलियन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत एनी म्हणाली, “मला पोलंड, युरोप आणि जगभरातल्या पुरुषांसोबत झोपायची इच्छा आहे. मला पुरूषांसोबत धमाल करायला आणि सेक्स करायला आवडतं. पोलंडमध्ये सेक्स हा विषय वर्ज्य आहे. जर एखाद्याला आपली शरीरसुखाची भूक भागवायची असेल, तर अशा व्यक्तीला विकृत मानलं जातं.”
एनीने तर आपल्या या कारनाम्यांबद्दल माहिती देण्यासाठी फेसबुक पेजही बनवलं आहे. तसंच स्वतःची वेबसाईटही बनवली आहे. प्रत्येक पुरूषासोबत सरासरी २० मिनिट घालवत लवकरात लवकर एनीला आपलं मिशन पूर्ण करायचं आहे.
मात्र अनेकांच्या मते एनीच्या म्हणण्यात तथ्य नाही. कारण एनीने जरी जेवण आणि झोपणं ही कामं सोडून फक्त संभोग करत राहायचं ठरवलं, तरीही तिला १ लाख पुरुषांचा टप्पा पार करायला ३.८ वर्षं लागतील. त्यामुळे तिचं लवकरात लवकर १ लाखाचा अकडा गाठण्यासाठी साधारण ४ वर्षं तरी लागणारच आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 1, 2013 - 16:15
comments powered by Disqus