सेक्सदरम्यान काच फुटली आणि...

By Shubhangi Palve | Last Updated: Sunday, July 7, 2013 - 13:53

www.24taas.com, झी मीडिया, कोलंबो
चिनमधला आणखी एक विचित्र घटना समोर आलीय. एका जोडप्यावर सेक्स दरम्यान मृत्यूचा प्रसंग ओढवलाय.
झालं असं की, चीनमधील वुहान शहरामध्ये एक जोडपं एका मोठ्या काचेच्या बाजुला सेक्स करत असताना अचानक काच निखळली. आणि हे जोडपं उंचावरून खाली पडलं. सूत्रांच्या माहितीनुसार, हे जोडपं घरातील खिडकीच्या एका आरशाला लागून सेक्स करत असल्याचे कळतंय. त्याचवेळी आरसा तुटल्याने दोघांचा खाली पडून मृत्यु झाला. उंचावरुन पडल्यानं जागेवरच दोघांचा मृत्यु झाला.
काही दिवसांपूर्वीच, एक जोडप वाघाच्या गुहेत जाऊन सेक्स करत असल्याची घटना समोर आली होती. पण, त्यामध्ये त्यातील मुलाचा जीव वाचला असून मुलीला आपला जीव गमवावा लागलाय.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की ते जेव्हा पडले तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते आणि त्या दोघांनी एकमेकांना घट्ट पकडले होते. या सर्व प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 30, 2013 - 14:55
comments powered by Disqus