सेक्सदरम्यान 'आयएस कमाल आहे' असा आवाज आला, शेजाऱ्यांनी बोलावले पोलिसांना

न्यूयॉर्कमध्ये एक अजीब प्रकरण समोर आलंय. येथील एका वृद्ध महिलेने शेजारच्या घरातून आयएस कमाल आहे असा आवाज ऐकला त्यानंतर त्या महिलेने तात्काळ पोलिसांना बोलावले.

Updated: Dec 24, 2015, 12:17 PM IST
सेक्सदरम्यान 'आयएस कमाल आहे' असा आवाज आला, शेजाऱ्यांनी बोलावले पोलिसांना title=

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये एक अजीब प्रकरण समोर आलंय. येथील एका वृद्ध महिलेने शेजारच्या घरातून आयएस कमाल आहे असा आवाज ऐकला त्यानंतर त्या महिलेने तात्काळ पोलिसांना बोलावले.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, विस्कॉन्सिन प्रांतातील बाऊन डीअर येथे राहणारी एका ८२ वर्षाच्या वृद्ध महिलेने शेजाऱ्यांच्या घरातून सेक्सदरम्यान दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट्स(आयएस) कमालीची आहे, असे बोलताना ऐकले. यानंतर ताबडतोब या महिलेने पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली 

दरम्यान, पोलिसांनी त्या वृद्धेला पुन्हा तसाच आवाज ऐकू आल्यास कळवण्यास सांगितले. याबाबत तेथील पोलीस प्रमुखांनी ट्विटरद्वारे या घटनेची माहिती दिली. दरम्यान, ट्विटरवरुन या घटनेची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. काहींनी त्या महिलेला चुकीचे ठरवले तर काहींनी वृद्धेच्या बाजूने मते दिली.