पुरुष पस्तिशीत खूष!

By Prashant Jadhav | Last Updated: Saturday, November 3, 2012 - 10:20

www.24taas.com, वॉशिंग्टन
पुरुष हे वयाच्या ३७ व्या वर्षी सर्वात जास्त खूष असतात असा विचित्र निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.
या संशोधनानुसार वयाच्या ३७ व्या वर्षी बरेचसे पुरुष हे आपल्या नोकरीत स्थिरावलेले असतात, त्यांनी लग्न करून कुटुंब सुरू केलेलं असते, या काळात आनंद देणार्याु बर्याकचश्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत असतात त्यामुळे ते त्या दरम्यान जास्त खूष असतात.
युके मेन्सवेअर ब्रॅण्डने केलेल्या संशोधनानुसार मुलं होणं हे जितकं स्त्रीसाठी आनंदाची गोष्ट असते तितकीच पुरुषासाठीही असते. या वयात बरेचसे पुरुष हे वडील होत असतात त्यामुळे हे या वयात खूष राहण्याचे मुख्य कारण आहे. ४३टक्के पुरुषांना वडील होण्याचा काळ हा सर्वात जास्त आनंददायी वाटतो.

First Published: Saturday, November 3, 2012 - 10:13
comments powered by Disqus