अखेर समुद्रतळाशी सापडलं एअर एशियाचं विमान

एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात सर्च टीमला यश मिळालंय. एका रिपोर्टनुसार जावाच्या समुद्रतळाशी २४ ते ३० मीटर खोल बेपत्ता विमानाचे अवशेष मिळालेत. सर्च टीमनं इंडोनेशियाजवळील समुद्रतळाशी पोहोचून एअर एशियाच्या विमानाचा शोध घेण्यासाठी ध्वनी उपकरणांचा वापर केलाय. 

Updated: Dec 31, 2014, 04:20 PM IST
अखेर समुद्रतळाशी सापडलं एअर एशियाचं विमान title=

जकार्ता/सिंगापूर: एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात सर्च टीमला यश मिळालंय. एका रिपोर्टनुसार जावाच्या समुद्रतळाशी २४ ते ३० मीटर खोल बेपत्ता विमानाचे अवशेष मिळालेत. सर्च टीमनं इंडोनेशियाजवळील समुद्रतळाशी पोहोचून एअर एशियाच्या विमानाचा शोध घेण्यासाठी ध्वनी उपकरणांचा वापर केलाय. 

खराब हवामानामुळे घटनास्थळापासून प्रेतं वाहून जात आहेत. अपघाताचं हे ठिकाण या दुर्दैवी विमानाचा संपर्क जिथं तुटला होता तिथून जवळ आहे. रविवारी सकाळी बेपत्ता झालेल्या या विमानात १६२ प्रवासी होते. दुर्घटनेचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. 

आतापर्यंत ७ मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत. पहिले तीन मृतदेह काढले होते, त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह होता. आणखीही चार मृतदेह नुकतेच काढले गेले आहेत.  

या विमानाचे अवशेष जावा बेटाच्या किनारपट्टीजवळील भागात आढळून आले. विमान समुद्रात कोसळल्याचं स्पष्ट होताच सुराबाया इथं प्रवाशांच्या नातेवाइकांच्या दु:खावेगाला पारावार राहिला नाही. अश्रूंचा बांध फुटला... समुद्रात सापडलेले अवशेष बेपत्ता विमान ‘क्यूझेड ८५०१’ चेच असल्याचे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयातील हवाई परिवहन विभागाचे प्रभारी महासंचालक जोको मुर्जातमोदो यांनी सांगितल्यानंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाइकांच्या दुखा:ला पारावर उरला नाही. त्यांच्या परतीची अखेरची आशाही संपुष्टात आल्यानं अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.