मलेशियात 'एलियन´ समजून अस्वलाला झोडपले

 मलेशियाच्या जंगलात एलियन आल्याच्या संशयावरून एका जीवाला पाम ऑइल जंगलात काम करणाऱ्या कामगारांनी मारलं. हा सरपटणाऱ्या जीवाच्या व्हिडिओने काही दिवसांत इंटरनेटवर खळबळ माजवली. मात्र, तो एलिअन नसून नष्ट होत जाणारी अस्वलाची एक जात सन बेअर होतं. 

Updated: Feb 4, 2015, 09:11 PM IST
मलेशियात 'एलियन´ समजून अस्वलाला झोडपले title=

मलेशिया :  मलेशियाच्या जंगलात एलियन आल्याच्या संशयावरून एका जीवाला पाम ऑइल जंगलात काम करणाऱ्या कामगारांनी मारलं. हा सरपटणाऱ्या जीवाच्या व्हिडिओने काही दिवसांत इंटरनेटवर खळबळ माजवली. मात्र, तो एलिअन नसून नष्ट होत जाणारी अस्वलाची एक जात सन बेअर होतं. 

या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अशा प्रकारचा जीव आम्ही कधी पाहिला नाही. आमच्या पैकी एकाने त्याला मारहाण केली. पण नंतर समजले की तो नष्ट होत चाललेल्या अस्वलाच्या एका जाती पैकी आहे. जेव्हा या प्राण्याला शुद्ध आली तेव्हा आम्ही त्याला पुन्हा जंगलात हुसकावण्याचा प्रयत्न केला. 

असा प्रकारचा जीव पाहिल्यावर मलेशियातील व्यक्तींना तो परग्रहावरील प्राणी आहे. तो आपल्यावर हल्ला करू शकतो त्यामुळे त्यांनी त्याला मारहाण केली. वन्यजीव संरक्षक यांनी सांगितले की, हा सन बेअर आहे. त्याच्या अंगावरील केस गळाल्यामुळे तो विचित्र एलिअन सारखा दिसत होता. 

पाहा हा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.