अमेरिकेतील मुलांमध्ये लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत घट

अमेरिकेतल्या किशोर वयोगटातील मुलांमध्ये मागील २५ वर्षात लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

Updated: Jul 22, 2015, 04:41 PM IST
अमेरिकेतील मुलांमध्ये लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत घट title=

वॉशिग्टन : अमेरिकेतल्या किशोर वयोगटातील मुलांमध्ये मागील २५ वर्षात लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 

सध्या अमेरिकेतली अर्ध्याहून कमी किशोरवयीन मुले-मुली लैंगिक संबंधात सक्रिय आहेत, तर १९८० च्या दशकात हा आकडा सर्वाधिक होता.

'नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमेली ग्रोथ' यांच्या संरक्षणात १९८८ ते २०१३ पर्यंतचा सगळा तपशील एकत्र केला होता. यात वय वर्षे १५ ते १९ मधील किशोरवयीन मुला-मुलींनी लैंगिक संबंधांसाठी गर्भनिरोधकांचा वापर केल्याचा उल्लेख केला आहे.

२०११ ते २०१३ मध्ये वय वर्ष १५ ते १९ मधील किशोर वयातील ४४ टक्के मुली आणि ४७ टक्के मुले लैंगिक संबंधात सक्रिय होते. तर १९८८मध्ये ६० टक्के मुले, तर ५१ टक्के मुली लैंगिक संबंधात सक्रिय होते, असे 'नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिक्स' या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.