अनॉर्ल्डची कारकीर्द बॅले डान्सने चमकली

Last Updated: Thursday, March 27, 2014 - 16:28

www.zee24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
हॉलिवुड अभिनेता अनॉर्ल्ड श्वार्झनेगर हा शरीरसौष्ठीसाठी प्रसिद्ध आहेच. मात्र त्याला बॅले डान्सने आणखी प्रसिद्धीचा झोतात आणलंय.
तसेच अनॉर्ल्ड यांना अभिनया व्यतिरिक्त राजकारणात पण रस आहे. ८०व्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. म्हणूनच त्यांचे फॅन्स त्यांना `अॅक्शन सुपरस्टार` म्हणतात.
वेटलिफ्टर ते अभिनेता झालेल्या अनॉर्ल्डला कधी डान्सचं शौक नव्हता. मात्र १९७६ मध्ये त्यांनी बॉडी बिल्डिंगवर आधारित डॉक्यूमेंटरी फिल्म `पंपिंग आयरन` मध्ये अभिनयासाठी मरीयाने क्लॅरीकडून बॅले डान्स शिकून घेतला. त्यानंतर मात्र अनॉर्ल्ड यांची चित्रपट कराकीर्द चमकतच गेली. तसेच खूप कमी लोकांना हे माहीत आहे, अनॉर्ल्डला बॅले डान्स पण येतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014 - 15:15
comments powered by Disqus