ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान घेणार 'क्रिकेटच्या देवा'ची भेट!

Last Updated: Thursday, September 4, 2014 - 10:22
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान घेणार 'क्रिकेटच्या देवा'ची भेट!

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट गुरुवारी मुंबईत दाखल झालेत. त्यांचा दौरा दोन्ही देशांदरम्यान रणनीती संबंध दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आला असला तरी हा दौरा त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. कारण, या दौऱ्यात ते सचिन तेंडुलकरचीही भेट घेणार आहेत. 

एबोट मुंबईतूनच आपल्या दोन दिवसांच्या या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. आज संपूर्ण दिवस एबॉट मुंबईमध्येच असतील. यावेळी ते काही प्रमुख उद्योगपती आणि काही निवडक भारतीय मुख्य कार्यपालक अधिकाऱ्यांचीही भेट घेतील. उभय देशांदरम्यान व्यापार तसंच वाणिज्य क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांवर यावेळी विचार विनिमय केला जाईल. एबॉट या यात्रे दरम्यान दोन्ही देशांदरम्यान अणु करार होण्याची शक्यताही वर्तवली जातेय. 

परदेश मंत्रालयातील संयुक्त सचिव (दक्षिण) संजय भट्टाचार्य यांनी दिलेल्य माहितीनुसार, एबोट ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्ट आणि ब्रेट लीसोबत या महान क्रिकेटरची भेट घेणार आहेत. यातून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मजबूत क्रिकेट संबंध दिसतील. 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात दाखल झाल्यानंतर क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये (सीसीआय) उपस्थित होऊन तिथं खेळाडुंशी संवाद साधतील. खेळासंबंधीत काही करारांवर इथं सह्या होण्याची शक्यता आहे. हे काय करार असतील याबाबत अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.  

आयसीसी वर्ल्ड कप पुढच्या वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाचा जोर आपल्या पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, September 4, 2014 - 10:22
comments powered by Disqus