चीनमध्ये जन्मलं ‘शेपटी’सहीत बाळ...

Last Updated: Monday, June 24, 2013 - 17:06

www.24taas.com, झी मीडिया, बीजींग
सात महिन्यापूर्वी चीनमध्ये अशा एका बाळाने जन्म घेतलाय ज्याला शेपटी आहे. आश्चर्य वाटल नां... पण ही काही अफवा नाहीय.
या बाळाचं माकडहाड थोड्याच दिवसांत खूपच मोठं झालंय. शेपटीसारखा जो भाग आहे त्याचा आकार गदेसारखा दिसतो. बाळाच्या अशा प्रकारच्या अवयवयामुळे सगळे हैराण झालेतच. पण त्याचबरोबर त्याच्या घरातले फार दु:खी झालेत. डॉक्टरांच असं म्हणणं आहे की, या बाळाच्या माकडहाडाचा योग्य तऱ्हेने विकास झाला नसल्यामुळे शेपटीच्या रुपात हा भाग उभारुन आला आहे. सुरुवातीला हा भाग लहान होता मात्र जसजसे महिने जाऊ लागले तसतसे हा भाग मोठा होऊन आता शेपटीसारखा दिसायला लागला.
या विचित्र आजार असलेल्या या बाळाचे नाव ‘जिआओ वेई’ आहे. या बाळाचं कुटुंब गुवादोंग या शहरात राहतं. सर्जरी करुन हा अनावश्यक भाग काढून टाकता येऊ शकतो का? असंही बाळाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांनी विचारून पाहिलं. पण, जरी हा अनावश्यक अवयव काढून टाकला तरी पुन्हा तो विकसित होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलंय.

हा एक प्रकारचा ‘स्पाइना बीफिदा’ नावाचा आजार आहे. ज्यात माकड हाडाचा योग्य विकास होत नाही. या आजारात माकड हाडाचा दरम्यान एक पोकळी राहून जाते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 24, 2013 - 16:51
comments powered by Disqus