फक्त १५० रूपयात घुसखोरी होईल...

Last Updated: Sunday, August 26, 2012 - 23:27

www.24taas.com, ढाका
एका बांगलादेशी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्यासाठी किती पैसे लागतात? फक्त १५० रूपये.केवळ दीडशे रुपयांत भारतात एन्ट्री मिळते. हजार-दीड हजाराचे पॅकेज दिले, की त्याला बांगलादेशातून उचलून मुंबईत सेट करेपर्यंत सारेच काम केले जाते. घुसखोरांवर कारवाई करणार्‍या विशेष शाखेच्या हाती ही धक्कादायक माहिती आली आहे.
गेल्या दीड वर्षामध्ये शहरात भारतीय म्हणून स्थायिक होऊ पाहणार्‍या दीड हजार बांगलादेशी घुसखोरांना विशेष शाखेने अटक केली. त्यापैकी सुमारे पाचशे घुसखोरांना मायदेशी पोचविण्यात आले. मात्र अधिकारी मुंबईत पोहोचण्याआधी हे घुसखोर परतलेले असतात!
बांगलादेशींना भारतात घुसविण्यासाठी एजंटांच्या टोळ्या बीएसएफ आणि बांगलादेश रायफल्स जवानांशी संधान साधून आहेत. मुंबईतून बांगलादेश आणि पुन्हा मुंबईत आणून सोडण्यासाठी अवघे दीड ते दोन हजार रुपये आकारले जातात. त्यात तो एजंट रेल्वेचे तिकीटही काढतो. विनारोकटोक सीमापार नेतो आणि पुन्हा भारतात आणूनही सोडतो.

First Published: Sunday, August 26, 2012 - 23:22
comments powered by Disqus