67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय...

कोणत्याही व्यक्तीला वडील बनण्याचा अनुभव खूप सुखद असतो. पण ७० व्या वर्षी पहिल्यांदा वडील झालेल्याचाा आनंद काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच आनंद झाला आहे बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना...

Updated: May 30, 2016, 02:24 PM IST
67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय... title=

ढाका : कोणत्याही व्यक्तीला वडील बनण्याचा अनुभव खूप सुखद असतो. पण ७० व्या वर्षी पहिल्यांदा वडील झालेल्याचाा आनंद काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच आनंद झाला आहे बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना...

काय झाले मुलगा की मुलगी

७० वर्षाच्या मुजीबुल यांना आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर कन्या रत्न झाले. शनिवारी त्यांची पत्नी हनुफाने एका खासगी हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. मंत्री महोदयांनी स्वतः याची माहिती दिली आहे. आई आणि मुलगी ठीक आहे. 

६७ वर्षी झाला होता विवाह

मंत्री महोदयांनी ६७ वर्षी आपल्या पेक्षा अर्धा वयाच्या हनुफा अख्तर रिक्ता हिच्याशी लग्न केले होता. हनुफा त्यावेळी २९ वर्षांची होती. आता ७० व्या वर्षी वडील झाल्याने मुजीबुल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.