किस करणाऱ्या महिलेचं नाक अजगराच्या कचाट्यात सापडलं

स्नेक शो चालवणाऱ्या थायलंडच्या एका २१ लाख ३६ हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. एका चीनी टुरिस्टने अजगरला किस करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्या अजगराने हल्ला करत या महिलेच्या नाकाला आणि तोंडाला, अजगराने जबड्याच्या कचाट्यात घेतलं.

Updated: Jan 11, 2016, 05:36 PM IST
किस करणाऱ्या महिलेचं नाक अजगराच्या कचाट्यात सापडलं title=

बँकॉक : स्नेक शो चालवणाऱ्या थायलंडच्या एका २१ लाख ३६ हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. एका चीनी टुरिस्टने अजगरला किस करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्या अजगराने हल्ला करत या महिलेच्या नाकाला आणि तोंडाला, अजगराने जबड्याच्या कचाट्यात घेतलं.

(थरारक व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

व्हिडीओत दोन जण अजगरला आरामात पकडलेले होते. एका लांब केसाच्या महिलेने अजगराचा पापा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने आपल्या जबड्याच्या महिलेचं नाक आणि तोंडाचा ताबा घेतला. यावेळी आजबाजूच्या लोकांनी जोरजोरात आरडाओरड केली.

लोकल फुकेत न्यूजने दिलेल्या माहितीनुसार २९ वर्षांच्या महिलेचं नाव जिन जिंग आहे, महिलेला फुकेत इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. थायलंडच्या मीडियाने या महिलेचा फोटो छापला आहे.

या महिलेच्या नाकावर काही टाके आहेत, स्नेक शो चालवणाऱ्या ओडस्की कंपनीचा एक प्रतिनिधीही तेथे बसला होता. महिलेला २१ लाख ३६ हजाराचा भरपाई देणार असल्याचं या प्रतिनिधीने सांगितलं, या शोमध्ये सापांचा पापा म्हणजेच किस घेण्याची परवानगी होती किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नाही.