VIDEO : बराक ओबामांचं निरोपाचं भाषण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी आज आपलं निरोपाचं भाषण देताना अमेरिकन लोकशाहीच्या परंपरेची जोरदार पाठराखण केली. 

Updated: Jan 11, 2017, 09:45 AM IST
VIDEO : बराक ओबामांचं निरोपाचं भाषण title=

शिकागो : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी आज आपलं निरोपाचं भाषण देताना अमेरिकन लोकशाहीच्या परंपरेची जोरदार पाठराखण केली. 

देशामध्ये अमूलाग्र बदल घडवायचा असेल,तर सामन्यातल्या सामन्य माणसाची इच्छशक्ती असणं गरजेचं असल्याचं ओबामांनी यावेळी म्हटलं. गेल्या आठ वर्षात केलेल्या चांगल्या कामांची जंत्री त्यांनी लोकांसमोर मांडली. उपस्थितांनी त्याला भरभरून दादही दिली.  

ओबामा सलग आठ वर्ष जगातल्या सुपर पावरच्या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. पुढच्या आठवड्यात नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार आहेत. त्याआधी ओबामांचं आजचं शेवटचं अध्यक्षीय भाषण झालं.

ओबामांच्या या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे हे भाषण शिकागोतून सर्वत्र लाईव्ह प्रसारित झालं. याआधीच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली निरोपाची भाषण व्हाईट हाऊसमधून दिली आहेत.

ओबामांचं हे भाषण निरोपाच्या भाषणांपैकी सर्वात मोठं भाषण ठरण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी ज़ॉर्ज बुश सिनिअर यांचं निरोपाचं भाषण 27 मिनिटं 25 सेकंद चाललं होतं.