दाट ढगात 200 मीटर उंचीवरून उडी

200 मीटर उंच इमारतीवरून उडी मारण्याचा पराक्रम दुबईच्या एका डेअरडेव्हिलनं केला आहे

Updated: Sep 12, 2016, 07:32 PM IST
दाट ढगात 200 मीटर उंचीवरून उडी title=

दुबई : 200 मीटर उंच इमारतीवरून उडी मारण्याचा पराक्रम दुबईच्या एका डेअरडेव्हिलनं केला आहे. या डेअरडेव्हिलची ओळख पटलेली नाही, मात्र त्याची ही उडी प्रसिद्ध झाली आहे. त्यानं उडी मारायचं निश्चित केलं आणि सगळी तयारी झाली. मात्र अचानक आकाशात ढग दाटून आले. खाली काहीच दिसत नव्हतं.

अशा स्थितीतही त्यानं जमिनीकडे झेप घेतली. त्याच्या हेल्मेटवर बसवलेला कॅमेरा आणि इमारतीत त्याच्या सहकाऱ्यांनी याचं चित्रीकरण केलं. जमिनीला पाय लागताच या स्टंटबाजीबद्दल समाधान व्यक्त करत तो शांतपणे निघूनही गेला.

पाहा उडी मारतानाचा थरारक व्हिडिओ