दूध टँकरमध्ये केली आंघोळ, तीन महिने डेअरी प्लांट बंद

चार पदरी पॅकिंगमध्ये असलेले बंद दूध आणि दूधाचे पदार्थ विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या क्वालिटीबाबत विश्वास दाखवता. कारण इतकं चांगलं पॅकिंग केलेलं दूध फिल्टर प्रकियेतून जातं, साफ प्लांटमधून हे दूध आपल्यापर्यंत पोहोचतं. मात्र रशियातील या डेअरी प्लांटमधील व्हिडिओ बघून तुम्हांला तुमच्या आवडत्या दूध कंपनीच्या गुणवत्तेबाबतही संशय निर्माण होईल. परदेशातलं हे दृश्य पाहून आपल्याला असं वाटेल की हा आपल्या आजूबाजूचा डेअर प्लांट तर नाही.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 1, 2014, 03:52 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, रशिया
चार पदरी पॅकिंगमध्ये असलेले बंद दूध आणि दूधाचे पदार्थ विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या क्वालिटीबाबत विश्वास दाखवता. कारण इतकं चांगलं पॅकिंग केलेलं दूध फिल्टर प्रकियेतून जातं, साफ प्लांटमधून हे दूध आपल्यापर्यंत पोहोचतं.
मात्र रशियातील या डेअरी प्लांटमधील व्हिडिओ बघून तुम्हांला तुमच्या आवडत्या दूध कंपनीच्या गुणवत्तेबाबतही संशय निर्माण होईल. परदेशातलं हे दृश्य पाहून आपल्याला असं वाटेल की हा आपल्या आजूबाजूचा डेअर प्लांट तर नाही.
रशियाची राजधानी मास्को इथं असलेल्या ट्रेड हाऊस चीज कंपनीच्या विक्रीत अचानक पणे कमी येवू लागली जेव्हा कंपनीतले दोन व्हिडिओ प्रसिद्ध झाले. प्लांटमध्ये आत दूधानं भरलेलं टँकरमध्ये काही लोक आंघोळ करतायेत, असं हे दृश्य होतं. याच टँकरमधलं दूध पॅक होऊन बाजारात विकलं जात होतं. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही कर्मचारी केवळ आंतर्वस्त्र घालून पनीर बनवतायेत. त्यांच्या हातात न ग्लव्स, ना डोक्यावर टोपी आणि नाही अंगात कपडे... म्हणजे स्वच्छेतेच्या नावानं बोंबच...
आता हे सगळं पाहून कोण येणार इथलं सामान घ्यायला. त्यामुळंच हे व्हिडिओ बघून लोकांनी कंपनीचं सामान खरेदी करणं बंद केलं. कंपनी मालकांनी यावर त्वरीत कारवाई करत चौकशीसाठी तीन महिने डेअरी प्लांट बंद ठेवलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.