बगदादमध्ये बॉम्बस्फोट, ७८ ठार

इराकच्या बगदाद शहरात प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला आहे.

Updated: Jul 3, 2016, 03:36 PM IST
बगदादमध्ये बॉम्बस्फोट, ७८ ठार title=

बगदाद : इराकच्या बगदाद शहरात प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला आहे, या स्फोटात ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० जण जखमी झाले आहेत. आयसीसने या हल्ल्य़ाची जबाबदारी स्वीकारली आहे.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला. गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

बगदादमधील कराडा येथे हा स्फोट झाला. यावेळी या भागात रमजान निमित्त लोकांची गर्दी होती. हा स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.