अमेरिकेत इमारतीत मोठा स्फोट; 11 जण जखमी

अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात एका इमारतीत आग लागल्यानंतर मोठा स्फोट झालाय. या स्फोटामुळं इमारतीचा काही भाग कोसळलाय. बॉयलर किंवा गॅसमुळं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2014, 09:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात एका इमारतीत आग लागल्यानंतर मोठा स्फोट झालाय. या स्फोटामुळं इमारतीचा काही भाग कोसळलाय. बॉयलर किंवा गॅसमुळं हा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत 11 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
खबरदारी म्हणून न्यूयॉर्क शहरातल्या ट्रेन्सही थांबवण्यात आल्या आहेत. इमारतीच्या परिसरात मोठ-मोठे ढिगारे झाले असून रस्त्येही जाम झाले आहेत. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झालाय.
जबरदस्त स्फोट झाल्याने एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. स्फोटानंतर इमारतीस आग लागल्याने जवळपासच्या भागात धुराचे लोट पसरले होते. यामुळे अग्निशामकच्या जवानांना आग विझविण्यातही अडचणी येत होत्या.
आग विझविण्याचे काम सुरू असून स्फोटामागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती न्यूयॉर्कच्या अग्निशामक विभागाने दिली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.