पाकिस्तान-झिम्बाब्वे वनडे दरम्यान आत्मघाती हल्ला

पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडिअमजवळ काल रात्री आत्मघाती हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळी गद्दाफी स्टेडिअममध्ये पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे सामना सुरु होता. हल्लोखोराला क्रिकेटचा सामना सुरु असलेल्या परिसरला टार्गेट करायचं होतं. मात्र हल्लेखोराला स्टेडियम परिसरात येण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Updated: May 30, 2015, 02:43 PM IST
पाकिस्तान-झिम्बाब्वे वनडे दरम्यान आत्मघाती हल्ला title=

लाहोर: पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडिअमजवळ काल रात्री आत्मघाती हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळी गद्दाफी स्टेडिअममध्ये पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे सामना सुरु होता. हल्लोखोराला क्रिकेटचा सामना सुरु असलेल्या परिसरला टार्गेट करायचं होतं. मात्र हल्लेखोराला स्टेडियम परिसरात येण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

गद्दाफी स्टेडिअमपासून एक किमी अंतरावर एका रिक्षात हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात उपनिरिक्षक अब्दुल मजीद यांचा मृत्यू झाला आहे. तसेच हल्ल्यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी स्टेडिअमध्ये २० हजार दर्शक उपस्थित होते. मात्र हा कट उधळून टाकण्यात पाकिस्तान पोलिसांना यश आलं आहे.

मार्च २००९नंतर आंतराष्ट्रीय टीमचा हा पहिला पाकिस्तान दौरा आहे. पाकिस्तान सहा वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेचं यजमानपद भूषवत आहे. पाकिस्तानमधील पंजाब सरकारने झिम्बाब्वे टीमला राष्ट्रपतींना पुरवली जाणारी सुरक्षा दिली आहे. 

याआधीही मार्च २००९मध्ये लाहोरच्या लिबर्टी चौकात श्रीलंकेच्या टीमच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेत श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.