सिरियात तीन बॉम्बस्फोट, ४० ठार

सिरियाची उपराजधानी अलेप्पो शहराच्या मध्यवर्ती भागात तीन बॉम्बस्फोटाचे धमाके झाले. या स्फोटामुळे दहशतीचे वातारवरण तेथे पसलले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट घडविण्यासाठी कारचा वापर करण्यात आला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 3, 2012, 05:02 PM IST

www.24taas.com,अलेप्पो
सिरियाची उपराजधानी अलेप्पो शहराच्या मध्यवर्ती भागात तीन बॉम्बस्फोटाचे धमाके झाले. यात ४० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या स्फोटामुळे दहशतीचे वातावरण तेथे पसलले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट घडविण्यासाठी कारचा वापर करण्यात आला.
या बॉम्बस्फोट हल्ल्यात ४० लोक मारले गेल्याचे येथील सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. तर ९० पेक्षा जास्त लोख जखणी झाले आहेत. हल्ल्यापैकी दोन बॉम्बस्फोट हे अलेप्पो शहराच्या `सादाल्लाह अल् जब्री` चौकामध्ये झालेत. हल्ला करण्यासाठी कारचा वापर करण्यात आला. हा भाग सिरिया सरकारच्या फौजेचे नियंत्रणाखाली आहे.
दरम्यान ब्रिटनस्थित एका गटाने बॉम्बस्फोटातील मृत आणि जखमींची संख्या १२हून अधिक असल्याचे म्हटले आहे. अलेप्पो शहरावरील नियंत्रणासाठी येथील सरकारी यंत्रणा मागील काही आठवड्यांपासून बंडखोरांशी लढत आहे.