पाक बॉम्बस्फोटात १७ ठार

By Surendra Gangan | Last Updated: Friday, February 1, 2013 - 16:56

www.24taas.com,इस्लामाबाद
पाकिस्तानात करण्यात आलेल्या एका बॉम्बस्फोटात १७ जण ठार झालेत. एका मशिदीजवळ आज बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात २० पेक्षा अधिक लोक जखमी झालेत.
पाकिस्तानमधील खैबर-पाखतुनख्वा प्रांतात असलेल्या हंगू गावातील एका मदिशीमधून लोक बाहेर पडत होते. यावेळी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात १७ ठार झालेत. यात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यtता आहे.
या बॉम्बस्फोटाची कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. या मशिदीजवळ गेल्या काही वर्षांपासून बॉम्बस्फोट होत असल्याच्या घटना घडत आहेत.



First Published: Friday, February 1, 2013 - 16:45


comments powered by Disqus