भर सभेतच राष्ट्राध्यक्षांनी पॅन्ट केली ओली!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, March 19, 2014 - 15:51

www.24taas.com, झी मीडिया, बगोटा
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युअल सॅन्टोस यांनी निवडणुक सभेतील एका भाषणादरम्यान स्टेजवरच आपली पॅन्ट ओली केली.
सॅन्टोस शनिवारी बैरनक्विला इथं आपल्या समर्थकांशी संवाद साधत होते. जसं जसं त्यांचं भाषण वाढत चाललं होतं तस तसं त्यांची पॅन्ट ओली होताना दिसून येत होती. त्याच अवस्थेत त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं.
स्टेजवर राष्ट्रपतींच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्या टीमचं याकडे लक्ष नव्हतंच... किंवा असेलही तरी त्यांची याबद्दल राष्ट्राध्यक्षांना सूचित करण्याची हिंमत झाली नसेल... पण, भाषण संपेपर्यंत राष्ट्राध्यक्षांना कुणीही थांबवलं नाही.
आणि एव्हढ्यातच राष्ट्राध्यक्षांसमोर उभ्या असलेल्या गर्दीतून एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात आपल्या राष्ट्राध्यक्षांचा हा पराक्रम कैद केला आणि तो इंटरनेटवर अपलोडही केला... काही वेळातच हा व्हिडिओ वायरल झालाय. यावर अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत... अनेकांनी यावरून राष्ट्रपतींची टर उडवलीय... तर बहुतेक जण आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वास्थ्यासंबंधी काळजीत आहेत.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि हार्वर्डमधून ग्रॅज्युएट झालेल्या सॅन्टोस हे २०१० साली कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. २०१२ साली त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा त्रास उद्भवला होता. सॅन्टोस यांना खात्री आहे की जनता दुसऱ्यांदा त्यांना कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून देईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014 - 15:39
comments powered by Disqus