जगात पहिला 'चॉकलेट डॉक्टर' बनण्याची संधी

Last Updated: Monday, August 18, 2014 - 17:31
जगात पहिला 'चॉकलेट डॉक्टर' बनण्याची संधी
लंडन: तुम्ही चॉकलेट खाता का? तुम्हाला चॉकलेट आवडतं का? मग आता तुम्हाला चॉकलेट आणखी आवडेल कारण क‌ॅम्ब्रीज विद्यापीठाला चॉकलेटवर पीएचडी करणाऱ्य़ा व्यक्तीची गरज आहे. 
 
मग आता जर तुम्हाला विश्वातला पहिला 'चॉकलेट डॉक्टर' बनायचं असेल तर तुम्हाला पीएचडीसाठी प्रवेश घ्यावा लागेल. या पीएचडीचा अभ्यासक्रम हा कॅम्ब्रीज विद्यापीठाच्या केमिकल इंजीनियरिग आणि जैव तंत्रज्ञान विभागाचा भाग आहे. हा अभ्यासक्रम जानेवारी २०१५ मध्ये सुरू होणार असून इच्छुक उमेदवार २९ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात असं प्रेस नोटमध्ये सांगितलं गेलं आहे. 

 
पीएचडीचा हा अभ्यासक्रम सध्या फक्त विश्व विद्यापीठ स्तरावर किमान चार वर्षाचा अभ्यास केलेल्या युरोपीयन नागरिकांसाठी उपलब्ध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Monday, August 18, 2014 - 17:31
comments powered by Disqus