छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसऱ्या सेलमध्ये हलवलं

इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन तुरुंगातही आपले रंग दाखवतोय. तुरुंगातील इतर कैद्यांसोबत हाणामारी केल्यानं राजनला दुसऱ्या सेलमध्ये शिफ्ट करण्यात आलंय.

Updated: Oct 30, 2015, 11:06 AM IST
छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसऱ्या सेलमध्ये हलवलं title=

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन तुरुंगातही आपले रंग दाखवतोय. तुरुंगातील इतर कैद्यांसोबत हाणामारी केल्यानं राजनला दुसऱ्या सेलमध्ये शिफ्ट करण्यात आलंय.
 
मिळालेल्या माहितीनुसार, राजन गेल्या सात वर्षांपासून ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात राहत होता. त्याच्याकडे मोहन कुमार नावाचा दुसरा भारतीय पासपोर्टही सापडलाय. ऑस्ट्रेलियाच्या सांघिय पोलिसांनी गेल्या महिन्यात छोटा राजन त्यांच्या देशात चुकीच्या नावानं राहत असल्याची पृष्टीही केली होती. 

आणखी वाचा - छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

राजनला गेल्या रविवारी, 25 ऑक्टोबरला इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाहून तो इथं एका रिसॉर्टमध्ये आरामासाठी दाखल झाला होता. 

अधिक वाचा - मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन
 
55 वर्षीय छोटा राजनविरुद्ध 1995 साली इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटिस जारी केलं होतं. त्याचा जन्म मुंबईत झालाय. राजनची सध्या बालीची प्रांतिय राजधानी डेनपासर स्थित पोलीस मुख्यालयात चौकशी सुरू आहे. 

अधिक वाचा - काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.