शिकागोमध्ये हिंसाचार, गोळीबार १४ ठार

अमेरिकेतील शिकागोमध्ये आठवड्याच्या सुट्टीच्या दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबार १४ लोकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. 

Updated: Jul 9, 2014, 02:23 PM IST
 title=

शिकागो : अमेरिकेतील शिकागोमध्ये आठवड्याच्या सुट्टीच्या दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबार १४ लोकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. 

हिंसाचाराला थांबवण्यासाछी अतिरीक्त पोलीस दल आणि पोलीस अधिकाऱ्यांना यश आले नाही. याबाबत पत्रकार परिषदेत पोलीस अधिकारी गॅरी मॅककार्थीने सांगितले की, पोलिसांनी केलेल्या खूप प्रयत्नानंतरही रविवारी आर्श्चयकारक  रितीने झालेल्या या संघर्ष थांबवण्यास अयशस्वी ठरलो. त्यावेळी पत्रकार परिषदेच्या काही तासांपूर्वी दोन लोकांची गोळी लागल्याने मृत्यू झाला होता.  

शिकागोमध्ये आठवड्याच्या सुट्टीच्या दरम्यान गोळीबार होण्याची ही ५३ वी घटना आहे. आतापर्यंत गोळीबार होण्याची ही ४६ वी घटना आहे त्यात १० घटना खूपच हिंसक ठरल्या आहेत. मॅककार्थीच्या माहितीनुसार, ४ जुलै आठवड्याच्या सुट्टीच्या दरम्यान झालेल्या गोळीबारात आणि ८ अन्य घटनांमध्ये पोलीसही सहभागी होती. यातल्या पाच घटनांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी संशयित आरोपींवर गोळी चालवली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.