चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीन सरकारने केले आहे. चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमतरता, यामुळे चीनमधील समस्या वाढण्याआधी सरकारने हे आवाहन केले आहे.

Updated: Jun 14, 2016, 07:00 PM IST
चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन title=

बीजिंग : चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीन सरकारने केले आहे. चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमतरता, यामुळे चीनमधील समस्या वाढण्याआधी सरकारने हे आवाहन केले आहे.

एवढंच नाही, दुसऱ्या अपत्याला जन्म द्यावा, यासाठीही सरकार दांपत्यांना प्रोत्साहित करत आहे. विशेष म्हणजे वृद्ध दांपत्यांनाही प्रोत्साहित करण्यात येत आहे. 

चीनमध्ये काही पुरुष स्वयंप्रेरणेने वीर्यदान करत होते. मात्र एका संशोधनातून स्वयंप्रेरणेने वीर्यदान करण्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे समोर आले आहे.

वीर्यदानासाठी तसेच तब्बल 1 हजार डॉलर्सपर्यंत रोख रक्कम किंवा एक आयफोन अशी प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येत असल्याचे वृत्त आहे.  

चीनमधील वीर्य बॅंकांना वीर्याची कमतरता जाणवत आहे. दरम्यान देशातील तरुण लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवित येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनमधील तरुणांन वीर्यदानाचे आवाहन करण्यात येत आहे.