'डेंजरस लव्ह'वर सरकारचा महिलांना इशारा

चीनमधील सरकारी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना 'परकीय नागरिक असलेल्या पुरुषांच्या प्रेमापासून सावध राहा' असा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा शिक्षण दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर हा सल्ला देण्यात आला.

Updated: Apr 19, 2016, 07:09 PM IST
'डेंजरस लव्ह'वर सरकारचा महिलांना इशारा title=

बीजिंग : चीनमधील सरकारी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना 'परकीय नागरिक असलेल्या पुरुषांच्या प्रेमापासून सावध राहा' असा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा शिक्षण दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर हा सल्ला देण्यात आला.

'डेंजरस लव्ह' ?

'डेंजरस लव्ह' मोहिमेमधून सल्ला देताना चीन सरकारने महिलांना म्हटलं आहे, चीनी महिलांबरोबरील प्रेमकरण हा देशाची गुप्त माहिती मिळविण्याच्या कटाचा भाग असू शकतो.

सरकारी विभागांत कार्यरत असलेल्या चीनी महिलांना खासकरून हा इशारा देण्यात आला आहे. सरकारने या पार्श्‍वभूमीवर एक 'प्रतिकात्मक कथा' सांगणारे पोस्टर प्रकाशित केले आहे.