अमेरिकेचा मोदी लाळघोटेपणा केवळ हास्यास्पद - चीन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या अमेरिकेत आहेत... मोदी, मोदी, मोदी असा एकच गजर सध्या अमेरिकेतही ऐकू येतोय... पण, भारताच्या कोणत्याही उल्लेखनीय गोष्टीवर नाक मुरडणारं चीन यावेळीही मागं राहिलेलं नाही. 

Updated: Sep 29, 2014, 03:07 PM IST
अमेरिकेचा मोदी लाळघोटेपणा केवळ हास्यास्पद - चीन title=

बीजिंग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या अमेरिकेत आहेत... मोदी, मोदी, मोदी असा एकच गजर सध्या अमेरिकेतही ऐकू येतोय... पण, भारताच्या कोणत्याही उल्लेखनीय गोष्टीवर नाक मुरडणारं चीन यावेळीही मागं राहिलेलं नाही. 

एकदा व्हिजा नाकारण्यात आलेल्या नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी लाळ घोटेपणा करताना अमेरिकेचे सगळे प्रयत्न केवळ ‘हास्यास्पद’ वाटतात, असं चीननं म्हटलंय. चीनच्या सरकारी मीडियात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखात, अमेरिकेला भारतासोबतचे आपले संबंध आणखीन मजबूत करायेत. चीनला रोखण्याची ही एक अमेरिकेची नीती आहे, असं म्हटलं गेलंय.

‘ग्लोबल टाइम्स’च्या वेबसाईटवर हा आलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. अमेरिकेत मोदींना ज्या पद्धतीचं आदरातिथ्य सध्या अनुभवायला मिळतंय त्याच्या अगदी विरुद्धची घटना म्हणजे २००५ साली अमेरिकन सरकारनं याच मोदींना व्हिजा देण्यास नकार दिला होता... पण, मोदींची ही नवीन यात्रादेखील फार   

‘शांघाय इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ या सरकारी संस्थेच्या एका अभ्यासकानं हा लेख लिहिलाय. मोदींच्या अमेरिकेच्या यात्रेच्या काही तास अगोदर न्यूयॉर्कच्या एका न्यायालयानं गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलीतील त्यांच्या कथित भूमिकेविरुद्ध समन्स धाडले होते. 

मोदी पंतप्रधानपदावर आरुढ होण्यापूर्वी आणि नंतर अमेरिकेचा बदललेली वागणूक केवळ हास्यास्पद आहे. जगात क्रमांक एकवर असलेल्या अमेरिकेला हे वागणं शोभा देत नाही. 

गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका भारताकडून असंतुष्ट राहिलीय. रणनीती आणि सुरक्षेच्या बाबतीत भारत आणि अमेरिकेच्या लक्ष्यांमधलं स्पष्ट अंतर अजूनही कायम आहे, असंदेखील या लेखात नमूद करण्यात आलंय 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.