जगातील सर्वात उंच विमानतळ चीनमध्ये सुरू!

चीननं जगातील सर्वात उंच सिव्हिलियन एअरपोर्ट नुकतंच सुरू केलंय. यामुळे चीनला पश्चिम क्षेत्रात फक्त पर्यटनालाच वाव मिळणार नाही तर राजनैतिक पकडही घट्ट होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 18, 2013, 11:32 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बिजिंग
चीननं जगातील सर्वात उंच सिव्हिलियन एअरपोर्ट नुकतंच सुरू केलंय. यामुळे चीनला पश्चिम क्षेत्रात फक्त पर्यटनालाच वाव मिळणार नाही तर राजनैतिक पकडही घट्ट होईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
उंच ठिकाणी हवेचा जोर कमी असल्यानं नेहमीपेक्षा जास्त लांबीच्या ‘रन वे’ची आवश्यकता असते. ‘डाओचेंग याडिंग’वर ४२०० मीटर उंचीवर बनलेल्या या एअरपोर्टचा ‘रन वे’ न्यूयॉर्कच्या जॉन एफ. कॅनेडी (जगातील सर्वात मोठं विमानतळ) विमानतळापेक्षा केवळ २४२ मीटर छोटं आहे. हा रन वे ४.२ किलोमीटर लांबीचा आहे.
या विमानतळाची उंची अधिक असल्यानं प्रवाशांना डोकं दुखणं, उलट्यांचा त्रास होणं किंवा ऑल्टिट्यूड सिकनेस जाणवल्याचं सांगण्यात येतंय.

तिबेट येथील शिचुआन भागात हे विमानतळ उभारण्यातत आले आहे. या विमानतळामुळे दोन दिवसांचा प्रवास फक्त एका तासांवर आला असून पर्यटन विकासासोबत या भागावर पकड घट्ट करण्याखचा चीनचा इरादा स्पदष्ट केलाय. चीनने तिबेटमध्येर आतापर्यंत पाच विमानतळ उभारले आहेत. गोंगर, ल्हा‍सा, बांगडा, झिगेज आणि नगारी येथे हे विमानतळ आहेत. रस्तेा आणि रेल्वे वाहतुकीसोबत या दुर्गम भागात आता विमानसेवाही सुरु झाली आहे. त्याडमुळे भारताची चिंता वाढली आहे. या सुविधांमुळे चीनला सीमेपर्यंत सैन्यय तैनाती अधिक वेगाने करता येऊ शकते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.